Latest Marathi Jokes
Loading...

घातक ठरू शकते गर्भावस्थेमध्ये केलेले व्यसन….

78

प्रेग्नंसी मध्ये दारू पिणे बाळासाठी ठरू शकते हानिकारक

प्रेग्नंसी मध्ये दारू पिणे चांगले कि वाईट हा प्रश्न अनेकांना पडतो. गर्भावस्थेमध्ये किती प्रमाणात दारू प्यावी ह्याचे प्रमाण निश्चित पाने कुणीही सांगू शकत नाही. दारूतील अल्कोहोल चे प्रमाण बाळला कसे हा निकारक ठरतातहेदेखील सांगणे कठीण आहे. 

ह्या पाच गोष्टींवरून  कळू शकेल कि गर्भावस्थेमध्ये दारू पिणे चांगले असते कि वाईट.

१.गर्भावस्थेमध्ये दारू आणि प्रेग्नंसी ह्या दोन्ही गोष्टी कधीही बरोबर असू शकत नाहीत. गर्भावस्थेमध्ये केलेल्या दारूच्या सेवनाने बाळला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हे बाळाच्या जीवावर बेतू शकते.

 

२.भारतातील अनेक आरोग्य संस्थांचे असे म्हणणे आहे कि गर्भावस्थेमध्ये केलेल्या दारूच्या सेवनाने बळावर गंभीर परिणाम होतात त्यामुळे दारूपासून लांब राहणे किमान ह्यादिवसात तरी थांबवावे.

Loading...

३.जेव्हा गर्भवती दारूचे सेवन करत असते तेव्हा दारूतील अल्कोहोलचे घटक रक्तातून थेट बाळाच्या गर्भापर्यंत पोहोचतात आणि हळूहळू बाळाच्या वाढीवर परिणाम करतात.

४.अनेक रिसर्च मधून असे आढळून आले आहे कि गर्भावस्थेमध्ये दारूचे सेवन हे बाळाच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. अश्या परिस्थितीत बाळ गर्भातच दगावण्याची शक्यता असते. बाळाचे वजन कमी होणे तसेच त्याच्या बुद्धीची विकसितता कमी होते. तसेच त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.

५.फेटाळ अल्कोहोल स्पेक्ट्रम डीसओर्डेर (एफएएसडी ) हि एक अशी संकल्पना आहे ,जिच्यामध्ये अल्कोल्मुळे होणार्या परिणामांची तीव्रता अभ्यासली जाते. अल्कोहोलच्या अति प्रमाणामुळे बाळाच्या चेहेर्याची असामान्यता,नर्वस सिस्टीम मध्ये दोष अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

You might also like
Loading...
%d bloggers like this: