Latest Marathi Jokes
Loading...

सलमान खान लवकरच बाबा होणार?

15

सलमान खान लग्न कधी करणार या विषयावर नेहमीच चर्चा होत असतात आणि त्यावर सलमानचे उत्तर काय असेल याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. पण आता सलमानच्या लग्नाचे सोडा, त्याच्याही पुढची एक बातमी समोर येत आहे. ही बातमी म्हणजे सलमान खान लग्न न करताही पिता बनण्याचा विचार करत आहे.

सलमान खान 52 वर्षांचा झाला आहे. तरीही देशातील मोस्ट एलिजेबल बॅचलर्समध्ये त्याचे नाव सर्वात पुढे आहे. तसेच असले तरी अजूनही त्याचा काही लग्नाचा विचार पक्का ठरलेला दिसत नाही. पण इतक्यात लग्न करणार नसला तरी, सलमान आता पिता बनण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका एंटरटेनमेंट पोर्टलवरील बातमीनुसार सलमान दोन-तीन वर्षांत पिता बनण्याचा विचार करत आहे. त्यासाठी तो सरोगसीची मदत घेणार असल्याच्याही चर्चा आहेत.

वय झाले..
सलमानच्या मते तो आता 50 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे जेव्हा त्याची मुले 20 वर्षांची होतील तेव्हा तो 70 वर्षांचा असेल. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून सरोगसीच्या माध्यमातून वडील बनण्याचा त्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

आई वडिलांची इच्छा..
सलमानच्या मते त्याचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान यांची अशी इच्छा आहे की सलमानच्या बाळाला पाहावे. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाच्या बाबतीत विचार करत असल्याचे तो म्हणाला आहे.

दला रिलीज होणार ‘टायगर जिंदा है’
सलमानचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है 2018 च्या ईदला रिलीज होणार आहे. पण आता त्याने वडील बनण्याचा विचार सुरू केल्याने, याबाबतीत पुढची बातमी काय येते याकडेच सर्वांचे जास्त लक्ष राहणार आहे.

Loading...

कायद्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता..

बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच, आता तो बाबा होण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

शाहरुख खान, आमीर खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यापाठोपाठ आता सलमान खानही सरोगसी पद्धतीने बाबा होण्याची तयारी सुरु केली आहे. करण जोहर आणि तुषार कपूर हे सरोगसीद्वारे सिंगल फादर झाले आहेत. तर शाहरुख आणि आमीर यांनी लग्नानंतर सरोगसीद्वारे पितृत्व स्वीकारलं.

जर हे वृत्त खरं ठरलं, तर करण जोहर आणि तुषार कपूरनंतर सलमान खान बॉलिवूडचा सिंगल सरोगेट फादर असेल.

वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात सरोगेट बाबा बनण्याचा सल्लूचा मानस आहे.

You might also like
Loading...
%d bloggers like this: