हिवाळ्यातला भारत असा दिसतो,जगात कुठेही नसतील अशी ठिकाणे…!

0
40
Loading...

जर तुम्ही ह्या हिवाळ्यात picnic ला जायचा विचार करत असाल तर भारतातील ह्या काही अप्रतिम ठिकाणांना नक्की भेट द्या.

Loading...

१. गोवा –


गोव्याचा समुद्रकिनारा हा भारतातला सर्वात सुंदर समुद्र किनारा मानला जातो .जगभरातल्या हौशी पर्यटकांसाठी गोव्याचा समुद्रकिनारा हा आकर्षणाचा विषय असतो. उन्हाळा ,पावसाला आणि हिवाळा ह्या तीनही ऋतुंमध्ये गोव्यामध्ये
फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत . तरीसुद्धा हिवाळ्यामध्ये सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे music festival. हा festival म्हणजेच sunbern festival. हा भारतातला सर्वात मोठा festival असतो. जगभरातल्या संगीत
प्रेमींसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. समुद्र किनाऱ्या भोवती असणाऱ्या नारळाच्या झाडांबरोबरच तेथील अल्हाददायक वातावरण मन प्रसन्ना करून टाकतं. हिवाळ्यातला थंडीचा अनुभव खूपच मजेशीर असतो. गोव्याची भाषा हीदेखील
एक गमतीचा भाग आहे. तसं पाहिलं तर गोवा हे आकाराने खूप लहान राज्य आहे,पण त्याला अनेक नैसर्गिक गोष्टींनी मोठं बनवलय.

२.आगरा –


जगातल्या काही निवडक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ह्या ठिकाणाचं वैशिष्ठ्य जगजाहीर आहे .ताजमहाल, एक विलक्षण कलाकृतीचा नमुना. प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताजमहालाकडे पाहून लोक थक्क होतात. ताजमहाल हे
नाव ऐकलेलं नाही असा एकही भारतीय नसावा. पौर्णिमेच्या रात्री ताजमहाल अजून उजळून निघतो आणि हा क्षण खूप सुंदर असतो. मुघल सम्राट Shah Jahan ने त्याच्या पत्नीसाठी हि अनोखी वास्तू साकार केली. १७ hectar म्हणजेच जवळ
जवळ ४२ acre जमिनीवर साकारलेली हि वास्तू खरच खूप सुंदर आहे. ७३ मीटर( २४० फुट ) उंची असणाऱ्या ताजमहालाकडे बघताना त्याची भव्यता लक्षात येते. उत्तरप्रदेश राज्यात आगरा(ताजमहालचा)समावेश होतो.यमुना नदीच्या किनाऱ्यावर
वसलेल्या ताजमहालाला भेट देण्यासाठी दूर-दुरहून लोक येतात. विशेष म्हणजे ताजमालाचा घुमत कसा बांधला असावा ह्यावर अनेक शास्स्रज्ञांनी अभ्यास केलाय पण कुणालाही त्याचा नेमका अंदाज आलेला नाही,अनेक विदेशी अभियंते
ताजमहालचा अभ्यास करण्यासाठी येतात. ताजमहाला बरोबरच आगऱ्यामध्ये लाल किल्ला, सिकंदरचा किल्ला ,अकबरचा मकबरा ,रामबाग अशी अनेक ठिकाणे आहेत.

३.काश्मीर –

Loading...


काश्मीर हे ठिकाण भारताच्या उत्तर दिशेला आहे. काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग म्हणतात त्याचं कारणही तसच आहे. हिमालयाच्या कुशीत असलेलं हे ठिकाण निसर्गाचा चमत्कार आहे. येथे प्रचंड थंडी असते. इथला बहुतांशी भाग
हिमच्छादित असतो.दरवर्षी लाखो लोक इथे भेट देतात आणि प्रसन्न होतात. इथे अनेक मसाल्यांच्या पदार्थांची शेती केली जाते. तसेच इथे विविध प्रकारच्या फुलांची लागवड देखील केली जाते. इथे केशर हा अत्यंत महागडा समजणारा पदार्थ देखील
मोठ्या प्रमाणात मिळतो. काश्मीरला खास करून हनिमूनसाठी सर्वोत्तम पर्याय मानलं जातं. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे जमतात आणि मजा करतात. हिमालयाच्या कुशीत सफर करण्यासाठी इथे रोपवे ची सुविधा आहे. रोपवेमधून
जातानाचा प्रवास पोटात गोळा आणतो आणि हि गंमत अनुभवण्यासाठी लोक इथे गर्दी करताना दिसतात. इथे केसाळ प्राणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

४.केरळ-

 ४० पेक्षाही जास्त नद्या असलेलं हे ठिकाण अतिशय रमणीय आहे. भारत दर्शन करायचं असेल तर ते केरळ शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. केरळचं हवामान मुळात उष्ण आहे पण अनेकदा इथे पाऊस पडत असल्यामुळे वातावरण
समशीतोष्ण होऊन जाते. त्यामुळे हे पर्यटकांचं केंद्रबिंदू आहे. नद्यांबरोबरच इथे मोठमोठे पर्वतसुद्धा आहेत. ह्यासर्वांसोबतच भटकंतीसाठी विशेष असे ठिकाण म्हणजे समुद्र किनारे. भारतातील विविधरंगी आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांमध्ये
केरळच्या समुद्र किनार्यांचा समावेश होतो. इथली मुख्य भाषा हि मल्ल्याळम आहे. केरळमध्ये बघण्यासारख्या गोष्टींमध्ये नौकाविहार हा प्रकार फार मजेशीर असतो. लोक होड्यांमध्ये बसून त्या वलव्हवतात आणि विशिष्ठ अंतर पार करतात,का एक
साहसी क्रीडा प्रकार आहे.विदेशी पर्यटकांना ह्याचं खूप कौतुक वाटतं. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात आणि त्याबरोबरच पर्यटकांसाठी अनेक प्रकारचे खाद्यप्रकार तयार केले जातात. मोठ्याप्रमाणात सुशिक्षित लोक असल्यामुळे
पर्यटकांना भाषेची व कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. इथे सुपारीच्या झाडांच्या बागा असतात.

५. महाबळेश्वर –


महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असं पर्यटन स्थळ म्हणजेच महाबळेश्वर.सातारा जिल्ह्यात असलेल्या ह्या ठिकाणाला एक वेगळाच स्थान आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंची असलेलं महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेच ठिकाण
म्हणून प्रसिद्ध आहे.हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीवरचं ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये ३० हून अधिक ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत.ह्या ठिकाणांना भेट देण्यासाठी दोन आणि चार चाकी गाड्यांचा पर्याय तिथे उपलब्ध आहे. पुण्यापासून
१२० किमी ,मुंबईपासून २४७किमि,औरंगाबादपासून ३४८ किमी अंतर पार करून तुम्ही महाबळेश्वरला भेट देऊ शकता. ३० वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये सावित्री point,आर्थर point,विल्सन point,एलेफंटा point,हेलन point,नाथकोट
बॉम्बे पार्लर,कर्णिक point… इत्यादी ठिकाणी तुम्ही फिरून आनंद घेऊ शकता. दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे जवळच असणारा प्रतापगड .केवळ २४ किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक देणगीमुळे
आणि तिथल्या हवामानामुळे इथे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाचा कार्यक्रम चालू असतो. एकूणच महाबळेश्वर एक विलक्षण अनुभूती देणारं ठिकाण आहे.

Loading...