पेन पकडण्याच्या पद्धतीवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे हे ओळखायला लावले तर कसे ओळखाल??

0
59
Loading...

पेन पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखा व्यक्तिमत्व एखाद्याचे व्यक्तिमत्व आपण त्याच्या चालण्या,बोलण्यावरून ओळखतो.त्याची बोलण्याची ढब , वागण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तिमत्वावर परिणाम करत असतात.आपण अश्या व्यक्तींचे अनेक गुण दोष न्याहाळत असतो.पण तुम्हाला कोणी त्या व्यक्तीच्या पेन पकडण्याच्या पद्धतीवरून त्याचे व्यक्तिमत्व कसे हे ओळखायला लावले तर……?

Loading...

हो अगदी बरोबर ऐकलत.

तुम्ही हे करू शकता पण त्यासाठी तुम्हाला खूप बारीक निरीक्षण करणे गरजेचे आहे. आजकालच्या मोबाईल च्या युगात लोक मोबाईल मध्ये गढून गेलेली दिसतात,लोक मोबाईल मध्ये लिहिताना म्हणजेच टायपिंग करताना आढळतात, त्यामुळे लिहिण्याची सवय बर्याच लोकांना राहिलेली नाही,पण तरीही त्यांच्या नुसत्या हातात पेन पकडण्याच्या पद्धतीवरून तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्व उलगडू शकता.

आपण पाहूयात कसे ते..

तर्जनी आणि अंगठ्यामध्ये

हि सामान्यपणे बर्याच व्यक्तींमध्ये आढळणारी पद्धत आहे.ह्यामध्ये तर्जनी आणि अंगठ्यात पेन धरून लिहितात. आता बघुयात कि कसे असतात हे लोक…. इमानदार आणि सरळ … हे लोक साधे आणि सरळ असतात.ते त्यांच्या कामाविषयी खूप एकनिष्ठ असतात.त्यांना धोकेबाज लोक आणि फिरवा फिरवी करणारे लोक पसंत नसतात.

मध्यमा आणि अंगठ्याच्यामध्ये …

Loading...

हे लोक पेन पकडण्यासाठी मधले बोट म्हणजेच मध्यम आणि अंगठ्याचा उपयोग करतात. हे लोक जिज्ञासू असतात ,त्यांच्या मनातील गोष्टी ओळखणे कठीण असते. ते मनातील गोष्टी मनातच ठेवतात.

अंगठा आणि इतर बोटांमध्ये….

 

जर तुम्हाला अश्या व्यक्ती आढळल्या तर समजून घ्या कि हे लोक कला क्षेत्रात जाणारी मनसे आहेत.हे लोक कलाकार असतात आणि ते सतत सकारात्मक असतात.

अंगठ्याने मध्यमा बोटाला झाकणे….

ह्या व्यक्ती खूप विचारी असतात.सध्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सखोल असतो.हे लोक घाई गरबाडीने निर्णय घेत नाहीत. ह्या खूप स्वप्नाळू प्रकारच्या व्यक्ती असतात.

बघा ट्राय करून आपल्या मित्रांसोबत..

Loading...