न पाहिलेले नाना, जाणून घ्या नाना बद्दक काही रोचक गोष्टी व नानाचे जीवन

0
344
Loading...

भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी नुकतीच वयाची 65 वर्षे पूर्ण
केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हा
एक उत्तम अभिनेते आहेत, याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर बिनधास्त आपले मत रोखठोक
मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. यावर्षी नानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना नाम& या
संस्थेमार्फत मदत केली. नाना सामाजिक तसेत राजकिया सर्वत्र बाबतील रोखठोक मत मांडतात. परंतु नानांनी या
सिनेसृष्टीत येण्यासाठी किती संघर्ष केला हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला नाना यांच्या खासगी
आयुष्याविषयी सांगत आहोत, त्यांना जन्म कुठे झाला आणि ते कसे या सिनेसृष्टीत आले…

Loading...

नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका
इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत
राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप
कमाई करू शकला नाही.राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक
होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली
निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण
बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८७ मध्ये
आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची
नायिका होती. १९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा
या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना
पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.
२०१४ मधील प्रकाश बाबा आमटे& या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. नाना यांचे खरे नाव विश्वनाथ

पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. आई संजना पाटेकर पत्नी नीलकांती पाटेकर
अपत्ये मल्हार पाटेकर.मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात
त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई
पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगा
असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. काही वर्षांतच त्यांचा
घटस्फोट झाला.


नाना पाटेकर यांचे विचार आहेत.
लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपली संस्कृती आपल्याला असे सांगते की,
भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या, तर त्यांचा संसार
सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या, एवढं काम करीत
असतो.पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षतां पैकी किती अक्षता त्या वधु – वरांच्या डोक्यावर पडतात ?

१०% सुध्दा नाही.जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर
टाकतो.२०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला
सतविण्यासाठी, कोणा व्यक्तीविरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक
विकृत आनंद मिळविण्यासाठी…लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून किंवा मंडपातून बाहेर येताना बहुतेकजण
डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर किंवा मंडपात
राहतो तांदळाचा सडा… तोही लोकांनी पायांनी तुडवलेला…आपल्या संस्कृतीत असं म्हटलं जातं कि “अन्न हे
पुर्णब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ? एका लग्नामध्ये
सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात, म्हणजे
सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा येथे लहान
मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.

तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा
ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर
२० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतकऱ्यांना , कष्टकर्या ला काम व पैसा मिळेल. कोणत्याही वधु-वरांला
डोक्यावर तांदळा ऐवजी मऊ, मखमली फुले पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा
जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक”
वाटेल, हो ना? आपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार
केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य
पुण्य नाही..!!! आपल्यालाही वाटत असेल की हा नवीन विचार आणि ही नवीन पद्धत सगळ्या महाराष्ट्रभर रुजली
पाहिजे, तर हा मेसेज तुमच्या व्हॉटस्अॅप कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असणाऱ्या सर्व मित्र – मैत्रीण, नातेवाईक यांना पाठवा.
नानांचे शेतकऱ्या विषयीचे विचार ..

Loading...

नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय
संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी झटणे हे
मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालंय, असे भावोउद्गार काढत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी समाजातील
दुःख आपण वाटून घेऊया, असे आवाहन केले. चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चिंचवड येथे
आयोजित विस्तारीत उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. ज्येष्ठ
दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, खासदार श्रीरंग बारणे व्यासपीठावर होते. नाना पाटेकर यांना ऐकण्यासाठी संपूर्ण सभागृह
शांत आणि धीरगंभीर होते. त्यामुळे भाषण करताना नाना काहीसे भावूकही झाले.

ते म्हणाले, मौन जास्त बोलकं असतं. लेखकाच्या दोन शब्दांमधील रिकामी जागा भरून काढण्याचे काम अभिनेता करीत असतो. परंतु, अभिनेताम्हणून आत्ता काहीतरी गवसतयं, असं वाटू लागले आहे. दुःख पराकोटीला जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीतआहे. परंतु, येथेच दुःख सुरू होत असल्याचे जाणवले. त्यामुळे कोणी हात पसरायच्या आधीच आपण त्यांना दिले पाहिजे, या भावनेतून काम करीत आहे.शेतकऱ्यांच्या आजच्या दयनीय अवस्थेबद्दल मी कोणत्या सरकारला दोष देणार नाही. टिपण्णी करणार नाही, असे नमूद करून ते म्हणाले, भाव वाढले. पगार वाढले. शेतीमालाला भावही
मिळाला. परंतु, त्याचा उत्पादन खर्च हा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यामुळे काय करायचे? या विवंचनेत
शेतकरी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आर्त भाव मनाला स्पर्श करतात. वेदना देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी
करण्याचे कारण मला मिळाले आहे. ते मी मरेपर्यंत करणार आहे.अभिनयाबद्दल मिळणाऱ्या पारितोषिकापेक्षा
जास्त समाधान आत्ता वाटत आहे. यातून मिळणारा आनंद हीच खरी पावती आहे, असे पाटेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १९६८ मध्ये मी मुकादमाचे काम करीत होत असल्याची आठवणही सांगितली.

नानांचे प्रेम …
मनीषा कोईराला तिच्या रोमॅण्टीक भूमिकांसाठी नेहमीच गाजली. पण तिच्या प्रेमसंबंधांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा
झाली असेल तर ती नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचीच. २० वर्षांनी मोठ्या, विवाहित माणसाच्या प्रेमात
मनिषा होती. इतर कलाकारांप्रमाणे नाना आणि मनिषा यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवले नाही. उलट ते नेहमीच
याबद्दल बोलायचे. ९० दशकाच्या सुरुवातीलाच हे प्रेमप्रकरण सुरु झाले. नाना पाटेकरांच्या अभिनयाबद्दल कोणीच
प्रश्न उभारू शकत नाही. पण असे असले तरी त्यांच्याकडे हिरोला साजेसे लूक कधीच नव्हते.. शिवाय एक रागीट
माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तर दुसरीकडे मनिषाचा विवेक मुशरन (सौदागर सिनेमातला सह कलाकार)
याच्याशी नुकताच प्रेमभंग झाला होता. नाना आणि मनिषा अग्निसाक्षी सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. लवकरच
नाना पाटेकरांची मोहिनी तिच्यावर पडली आणि ती स्वतःला त्यांच्या प्रेमात पडण्यापासून अडवू शकली नाही.

सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान ते एकमेकांना डेटही करु लागले. पण त्यांचे हे प्रेम प्रसारमाध्यमांपासून काही लपून
राहिले नाही. मनिषाचे शेजारी आणि सेटवरची काही माणसे नाना पाटेकर मनिषाला कधी भेटतात याची माहिती
आनंदाने देतच होते. अनेकदा नाना पाटेकर यांना मनिषाच्या घरुन पहाटे निघतानाही पाहिले गेलेले. पण ही जोडीही
फार काळ टिकली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नाना आणि मनिषाचे स्वभाव. दोघांचेही अस्थिर स्वभाव त्यांच्या
नात्यामध्ये दुरावाच आणत गेले. नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी भांडतानाही त्यांना पाहिले गेले आहे. नाना,
मनिषासोबतच्या नातेसंबंधांबाबत फार आग्रही होते. कोणत्याही सह कलाकारासोबत प्रेमाचे सीन चित्रित करताना ते
अनेकदा आक्षेप घ्यायचे. तसेच मनिषाने फार तोकडे कपडे घालू नये असेही त्यांना वाटायचे. युगपुरूषच्या
चित्रिकरणावेळी मनिषाने घातलेले कपडे त्यांना न आवडल्यामुळे त्यांच्यात मोठे भांडणही झाले होते. त्यांच्यातले हे
मतभेद नंतर एवढे वाढले की त्यांनी एकमेकांशी काही दिवस न बोलण्याचा निर्णय घेतला. या कठीण वेळेत तिने
अनेक मुलाखतीत हेही म्हटले की तिचे नानांवर प्रेम आहे पण त्याचे हे नाते कुठे जाणार हे मात्र माहित नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही एकमेकांना तेवढेच प्रेम करत होते यात काही शंका नाही. पण नानांच्या स्वभाव
तिला पटत नव्हता. पण एकदा मनिषाने नाना आणि आयेशा झुल्का यांना एका खोलीत एकत्र पाहिले. जेव्हा तिने या
दोघांना एकत्र पाहिले तेव्हा सगळ्यात आधी नाना पाटेकर यांच्यावर रागावण्यापेक्षा तिचा पूर्ण राग आयेशावर
निघाला. माझ्या नानापासून दूर हो असे म्हणत ती आयेशावरच रागावली. पण नाना आणि आयेशा दोघांनीही
त्याच्यात काही प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले नाही. शिवाय नानांना मनिषाला हे पटवून देण्यासाठी फार कष्ट पडले
नाहीत. पण त्यांनी वेगळे होण्याचे खरे कारण म्हणजे नाना पाटेकर यांनी मनिषाशी लग्न करायला नकार दिला.
त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते की, नीलकांतीला (नानांची बायको) कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट देणार नाही. शिवाय दुसरी बाई असा ठपका मनिषाला स्वतःच्या नावावर नको होता. म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय
घेतला. त्यानंतर ती दुसऱ्या एका व्यक्तीला डेट करत होती तर नाना आणि आयेशा यांनी आपल्या नातेसंबंधांवर
एकत्र राहून शिक्कामोर्तब केले होते.फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले होते की, त्यांना मनिषाची फार
आठवण येते. ‘ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी हरणासारखी आहे. तिला हे कळले पाहिजे की तिला
दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करायची काहीच गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे. तिने स्वतःची जी अवस्था करुन घेतली
आहे ते पाहून मला खूप रडू येतं. कदाचित माझ्याकडे आज तिच्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. प्रेमभंग ही
खूप कष्टदायक गोष्ट आहे. वेदना म्हणजे नक्की काय हे अनुभवण्यासाठी हा अनुभव घेणेही गरजेचे असते. मला
तेव्हा झालेल्या वेदना मी सांगू शकत नाही. कृपया याबद्दल आपण नको बोलूया. मला आजही मनिषाची आठवण
येते.’मनिषाने नंतर नेपाळी व्यावसायिक सम्राट दाहलशी विवाह केला. पण २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर
नाना पाटेकर आणि नीलकांती यांना मल्हार हा एक मुलगा आहे.

पुरस्कार..
वर्ष (इ.स.) पुरस्कार भूमिका चित्रपट
१९९० फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा
१९९२ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार
१९९५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
२००५ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२००५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२०१३ पद्मश्री पुरस्कार[१]
२०१६ गोदावरी गौरव पुरस्कार चित्रपटक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल…

Loading...