कलश पूजे मध्ये ठेवणे यासाठी आहे आवश्यक, हे आहेत खरी कारणे

0
422
Loading...

कलश मध्ये क चा अर्थ आहे जल आणि लश चा अर्थ सुशोभित करणे असे आहे म्हणजेच कलशचा अर्थ असे पात्र जे पाण्याने सुशोभित आहे. चला पाहूयात अजून काही महत्वाची माहीती.

Loading...

हिंदू धर्मा मध्ये कलश मांगल्याचे प्रतीक मानले गेले आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शुभ याचे प्रतीक मानले गेले आहे. यासाठी नवीन घरामध्ये किंवा नवीन वास्तू मध्ये जाताना सर्वात पहिले कलश पूजन केले जाते. मान्यता आहे की कलश (कळस) च्या वरच्या भागात विष्णू, मध्य भागात शिव आणि खालच्या भागात ब्रम्हाजी निवास करतात. यासाठी कळस ठेवताना त्यामध्ये देवी-देवातेंचा वास आहे असे मानून ठेवायचे असते.

कळसा मध्ये या गोष्टी टाकल्या जातात.

Loading...

शास्त्रा मध्ये पाणी नसलेला कळस ठेवणे अशुभ मानले गेले आहे. यासाठी कळसा मध्ये पाणी, पाने, अक्षता, केसर, कुंकू, सुपारी, दुर्वा-बेल, फुले, सुत, नारळ, धान्य इत्यादी वापरून पूजे साठी ठेवले जाते.

कळस आहे यांचे प्रतीक

कळसा मधील पाणी यागोष्टीचे प्रतीक आहे की आपले मन सुध्दा पाण्यासारखे शुध्द, निर्मळ आणि शितल राहावे. आपले मन श्रद्धा, तरलता आणि संवेदन युक्त राहो. यामध्ये लोभ, क्रोध, मोह-माया आणि घृणा कधी न यावी. कळसावर काढले जाणारे स्वास्तिक चे चिन्ह आपल्या आयुशातील चार अवस्थांचे प्रतीक आहे बाल्य, युवा, प्रौढ आणि वृद्धावस्था. तसेच कालशामध्ये असलेला नारळ गणपतीचे प्रतीक सुध्दा मानले जाते. तर सुपारी, दुर्वा, फुले इत्यादी गोष्टी जीवन शक्तीचे प्रतीक आहेत.

 

Loading...