दररोज सकाळी पाणी पिण्याचे फायदे पाहून आश्चर्यचकित होचाल

0
2474
Loading...

दररोज सकाळी पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. उपाशीपोटी पाणी पिण्याची कल्पना जपानमधून आली. तिथले लोक सकाळी उठून चार ग्लास पाणी पितात आणि त्यानंतर 30 मिनिटांनी नाश्ता करतात. त्यामुळेच शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया….

Loading...

त्वचेची चमक : सकाळी पाणी प्यायल्याने शरीरात असलेले विषारी पदार्थ पाण्यावाटे निघून जातात. या विषारी पदार्थांमुळेच त्वचा खराब होते. त्यामुळे उपाशीपोटी पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर जाऊन त्वचेची चमक कायम राहते.

आतड्याची शुध्दता : रिकाम्यापोटी पाणी प्यायल्यास शरीर आणि मोठ्या आतड्यात जमा झालेले आणि न पचलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. मोठं आतडं हा शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. मोठं आतडं पाणी आणि न पचलेलं अन्न शोषून घेतं. उपाशीपोटी पाणी प्यायल्यास आतडं साफ होतं, जेणेकरुन आतडं पोषक पदार्थ वेगाने आणि योग्यरितीने शोषून घेतं.

रोगप्रतिकार क्षमता : उपाशीपोटी पाणी प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही सहसा आजारी पडत नाही.

वजन कमी करा : पाण्यामध्ये कॅलरी नसतात. याशिवाय सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर पडतं. त्यामुळे चयापचय क्रिया वाढतं, जे कॅलरी बर्न करण्याय फायदेशीर ठरतं.

ऊर्जा : रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. त्यामुळेच रक्तात ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा होता. ऑक्सिजन मिळाल्याने दिवसभर तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते.

१. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

Loading...

२. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सादी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.

३. महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.

४. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घामातून बाहेर पडण्यास मदत होते.

५. गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्धपणी बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.

६. गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.

७. गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे

Loading...