Latest Marathi Jokes
Loading...

जगातले ५ प्रसिद्ध लोकं,ज्यांचा मृत्यू एड्स मुळे झाला…

505

जगातले ५ प्रसिद्ध लोकं,ज्यांचा मृत्यू एड्स मुळे झाला…

AIDS विषयी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी १ डिसेंबर हा AIDS DAY मनाला जातो. कारण ह्यामुले लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी आणि लोक ह्या आजाराचा सामना व्हावा हा ह्यामागचा हेतू आहे.

९ जुलै १९८६ साली मुंबईतील एका हॉस्पिटल मध्ये AIDS च्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. भारताबरोबरच जगातील अनेक लोकांनी ह्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. तरीसुद्धा ह्यावर ठोस असा इलाज सापडलेला नाही. एका भारतीय अभिनेत्रीचा मृत्यू देथिल ह्या रोगाने झाला होता. अनेक मोठ्या व्यक्तींबरोबरच सामान्य लोकही ह्याला बळी पडतात.

आपण आता असे काही लोक पाहणार आहोत कि ज्यांचा मृत्यू AIDS मुले झाला आहे.

१.निशा नूर…

 

८० च्या दशकातील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी हि अभिनेत्री साउथ इंडियन फिल्म्स मध्ये प्रसिद्ध होती.रजनीकांत आणि कमालहसन सारखे मोठे अभिनेतेसुधा तिच्याबरोबर काम करण्याची वाट बघत असत. त्या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण दुर्दैवाने एका दिग्दर्शकाच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला हे काम सोडावे लागले.नंतर तिचे खूप वाईट हाल झाले. नंतर ती रस्त्यावर आली.लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा कळले कि तिला AIDS आहे. २००७ मध्ये तिचा मृत्यू झाला.

२.पेड्रो पाब्लो जमोरा…

Loading...

हा एक गे होता. तेव्हा अमेरिकेमध्ये गे असणे हा अपराध मनाला जात असे त्या काळात त्याने स्वतःहून आपण गे असल्याचा स्वीकार आणि प्रचार केला होता. पाब्लो आणि त्याचा गे साथीदार एड्स ने ग्रस्थ होते. त्यांचा मृत्यू ११ नोव्हेंबर १९९४ मध्ये झाला.MTV च्या प्रसिद्ध कार्यक्रमात त्याने आपण गे असल्या चे सांगितले होते.

३.जिया सारंगी…

अमेरिकेच्या प्रसिद्ध मॉडेल पैकी एक असणारी हि मॉडेल खूप प्रसिद्ध होती.वयाच्या २६ व्या वर्षीच तिला एड्स ची लागण झाली होती.ह्या काळात ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती.drugs च्या अति सेवनाने तिचे जीवन नाहीसे होण्यास सुरुवात झाली आणि अंती तिला एड्स असल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

४.आर्थर एशे

अमेरिकेचा महान टेनिसपटू म्हणून ओळख असणारा हा प्लयेर असं होतं कि ज्याने पहिल्यांदा युएस डेवीस कप मध्ये टीमचे नेतृत्व केले होते आणि विम्बल्डन जिकली होती.त्यालाही ह्या रोगाने पछाडले.त्याला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा त्याने जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. १९९३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. रिक्की विल्सन अमेरिकेच्या संगीत क्षेत्रात नावाजलेली व्यक्ती म्हणून रिक्कीचे नाव घेतले जाते. ते ब्यांड B५२ चे सदस्य होते. त्यांना आपल्याला एड्स असल्याची बातमी १९८३ मध्ये समजली. त्यानंतर काहीच वर्षात त्यांचा एड्स मुले मृत्यू झाला.

You might also like
Loading...
%d bloggers like this: