श्रीमंत व्हायचंय ? घरात या गोष्टी कधीही ठेवू नका!

0
304
Loading...

Loading...

अनेकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतो. त्यासाठी वाट्टेल ते करायलाही तयार असतात. अनेक उपाय, अनेक पर्याय वापरले जातात. पण प्रत्येकाला श्रीमंती लाभत नाही. आज पैशांच्या मागे जग लागलं आहे. पैशांमुळे आज समाजात तुमचं स्टेट्स ठरतं. पण केवळ श्रीमंत होण्याची इच्छा ठेवून काहीच होत नसतं. त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. घरात काय आहे यावरूनही अनेक गोष्टी ठरत असतात. घरात जर चुकीच्या वस्तू असतील तर तुम्हाला कधीही श्रीमंती मिळू शकत नाही. त्यामुळे अशा वस्तू लवकर घराबाहेर करा. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीमुळे तुमच्या श्रीमंत होण्यात अडचणी येऊ शकतात….जाणून घेऊया काय घरात नकोय.

* कबूतराचं घरटं:

वास्त्रुशास्त्रानुसार घरात कबूतराचं घरटं अस्थिरता आणतं आणि सोबतच निर्धनतेला आमंत्रण देतं. यामुळे तुमच्याकडे पैसे थांबणार नाहीत. जर असं काही तुमच्या घरात असेल तर ते लवकरात लवकर हटवा.

* मधमाशांचं पोळं:

मधमाशांचा डंख किती खतरनाक असतो हे तसं सर्वांनाच माहिती आहे. यासोबतच तुमच्या घरात, खिडकीत किंवा भींतीवर मधमाशांचं पोळं असेल तर ते नकारात्मक परिणाम देतं. ते घरात असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे ते लवकर हटवा.

* जाळं:

घरात जळमटं असणं दुर्भाग्याचं लक्षण आहे. त्यामुळे कधीही घरात जाळं होऊ देऊ नका. त्यासाठी सतत घराची साफसफाई करत राहणं गरजेचं आहे.

Loading...

* फुटलेला आरसा:

घरात तुटलेला आरसा असे हे वास्तुशास्त्राच्या नियमांच्या विरूद्ध आहे. यासोबतच तुटलेला आरसा घरात असणं नकारात्मक उर्जा देतं. त्यामुळे तुमच्या अनेक कामांमध्ये अडथळा निर्माण होतो.

* भींतींवर निशाण:

जर तुमच्या घराच्या भीतींवर निशाण पडले असतील किंवा भींतींचे पोपळे निघायला लागले असतील. तर ते लवकरठिक करून घ्या. हे दुर्भाग्य आणि निर्धनतेला आकर्षित करतं.

* पाणी टपकणे:

जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून सतत पाणी टपकत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमच्या घरात पैशांची नासाडी होत आहे. त्यामुळे ते नेहमीच बंद करून ठेवा. सोबतच घरात कधीही धूळ होऊ देऊ नका. साफ ठेवा.

* सुकलेले फूल:

घराची सजावट करण्यासाठी कधीही सुकलेल्या फूलाची वापर करू नका. जर तुम्हाला फूल पसंत आहेत तर नेहमी ताजे फूल घरात ठेवा. यासोबत घरात कधीही सुकलेली पाने ठेवू नका.

(टिप: या माहितीतून आम्ही कोणताही अंधविश्वास पसरविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना अत्यंत महत्व देण्यात आलं आहे. त्याच आम्ही देतो आहोत.)

Loading...