राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार !

0
69
Loading...
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार !

09 आॅक्टोबर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्यामुळे महाराष्ट्रातही पेट्रोल 2 रुपये आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Loading...

राज्यात मुल्यवर्धित दरात कपात करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात येईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.

Loading...

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे पेट्रोलवरील 25 टक्के व्हॅट  आणि उर्वरित राज्यात 26 टक्के व्हॅट लागू आहे.  डिझेलसाठी व्हॅट 21% मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आणि राज्यातील 22% उर्वरित राज्यातील 2 रु. प्रति अधिभार आकारले जातोय. डिझेल आणि पेट्रोलवरील सरकारी शासनास व्हॅटमध्ये 19, 000 कोटी खात्यात जमा होतात.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची चर्चा केली. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Loading...