मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

0
71
Loading...

मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Loading...

मुंबई, 10 ऑक्टोबर: मुंबईत  विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. परळ दादर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे.

येत्या चार दिवसात मुंबईत आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. तसंच येत्या 24 तासात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता केंद्रीय वेधशाळेने वर्तवली आहे.तसंच जोरदार वाऱ्यासह 12 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या चार दिवसात मुंबईतील काही भागात 150 मि.मीपर्यंत पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याचं भाकीत आहे.

Loading...

दरम्यान आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. त्यातच आता काही भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

Loading...