Latest Marathi Jokes
Loading...

एका धर्माच्या सणावर गदा का?-चेतन भगतची फटाकेबंदीवर टीका

13
एका धर्माच्या सणावर गदा का?-चेतन भगतची फटाकेबंदीवर टीका

10 ऑक्टोबर: दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर चेतन भगतने टीका केली आहे. दिवाळीतील एक दिवशी फटाक्यांवर बंदी आणल्याने असा कितीसा फरक पडणार आहे तसंच वर्षातील उरलेले दिवस होणाऱ्या प्रदुषणाचं काय असा सवाल चेतन भगतने उपस्थित केला आहे. एका धर्माच्या सणावर गदा आणणारे मोहर्रमवर टीका का करत नाही असा प्रश्नही त्याने विचारला आहे.

दिल्ली हायकोर्टाने फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय दिला होता. यावर प्रसिद्ध लेखक चेतन भगतने सडकून टीका केली आहे. तो म्हणतो, ‘आज आपल्याच देशात त्यांनी मुलांकडून फुलबाजी हिसकावून घेतली आहे. माझ्या मित्रांनो हॅपी दिवाली’.’ हा वर्षातला एक दिवस आमचा सर्वात मोठा सण असतो’. तसंच बंदी घातल्याने काही साध्य होणार नाही असंही चेतन भगत म्हणतो. प्रयोगशीलता गरजेची आहे. ज्या व्यक्ती फटाक्यांच्या बंदीसाठी आग्रही असतात ते ज्या सणांमध्ये प्राण्यांच्या रक्ताचा समावेश असतो अशा सणांबाबत काय भूमिका घेतात हे मला पहायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. जर तुम्ही एक आठवडाभर वीज बंद ठेवून घरात वीज वाचवू शकता आणि गाडीचा वापर टाळू शकता तर तुम्ही दुसऱ्याच्या सणावर बंदी कशी आणू शकता? दिवाळी वर्षातून एक दिवस असते. म्हणजे 0.27 % तर प्रदूषण 99.6 % प्रदूषण हे अयोग्य व्यवस्थापन आणि नियमांमुळे होतं. कोणत्याही एका धर्माला तुम्ही अपराधीपणाची भावना देऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे.

Loading...
You might also like
Loading...
%d bloggers like this: